April 20, 2026 6:32 am

सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी चंद्रकांत हराळ यांची बिनविरोध निवड

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे

सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीसाठी दि.३ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी ११ वाजता समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर गटाचे चंद्रकांत हराळ यांची सर्वानुमते बिनविरोध सभापती पदी निवड करण्यात आली आहे.

सेनगाव बाजार समितीत भाजपा,शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसची युती असुन त्यांच्या करारानुसार सभापती व उप सभापती पदाचा कार्यकाल संपल्याने सभापती अशोकराव ठेंगल,उप सभापती मदन इंगोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने दि.१९ आँगस्ट रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या सौ.छायाताई बालासाहेब पोले यांची उप सभापती पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली होती तर दि.३ सप्टेंबर बुधवार रोजी सभापती पदाच्या निवडीसाठी बाजार समितीच्या सभागृहात सेनगाव सहाय्यक निबंधक अक्षय गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सर्वानुमते चंद्रकांत हराळ यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.हि निवड जाहीर होताच युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला व नुतन सभापती हराळ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगांवकर,भाजप नेते शिवाजीराव मुटकुळे,माजी जि.प.सदस्य व्दारकादासजी सारडा,माजी सभापती अशोकराव ठेंगल,उप सभापती सौ.छायाताई पोले,माजी जि.प.सभापती तथा संचालक संजयभैया देशमुख,तालुकाप्रमुख तथा संचालक संतोष देवकर,प्रकाशराव देशमुख,वैभव देशमुख,भिकाजी अवचार,सौ.संजिवनी बोरुडे,नारायण सावके,प्रकाश बिडकर,विजय तोष्णीवाल,विकास शिंदे,सौ.दिक्षा नरवाडे,अंकुश तिडके,सचिव गणेशराव देशमुख,निरीक्षक आर.आर.पतंगे,विलास नरवाडे,शिवाजी बुळे,एल.बी.पतंगे सह कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडी दरम्यान सेनगाव पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार सुभाष चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें