April 20, 2026 1:18 am

राजमुद्रा गणेश मंडळाकडून नागरिकांसाठी महाप्रसाद;भाविकांची गर्दी

संपादक कृष्णा कऱ्हाळे

डिग्रस (फा) येथे गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान,गुरुवार पासूनच अनेक ठिकाणी महाप्रसादाचे नियोजन सुरू झाले आहे.
विविध सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये महाआरतीसाठी भाविक गर्दी करत आहेत. त्यामुळे दोन दिवसा अगोदर पासून महाप्रसादाचे नियोजन केले जाते.

डिग्रस फाटा येथील राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने चार वर्षांपासूनची श्री गणेश स्थापना व महाप्रसादाची परंपरा यंदाही कायम आहे. दरम्यान, गुरुवारी मंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.

राजमुद्रा गणेश मंडळाची स्थापना डिग्रस फाट्यावरील काही नव तरुण व्यापाऱ्यांनी केली आहे.

श्री गणेश स्थापनेपासून राजमुद्रा गणेश मंडळाच्या सदस्याकडून गणेशोत्सवामध्ये महाप्रसादाचे आयोजन करून फाट्यावरील नागरिकांप्रमाणेच तसेच येजा करणाऱ्या प्रवाशांना आमंत्रित करण्याची परंपरा सुरू केली.

या वर्षी महाप्रसादाचे मुख्य नियोजन पुरी भाजी असे होते.यावेळी मोठ्या संख्येने फाट्यावरील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी
उपस्थिती लावली.

श्रींची स्थापना व महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी राजमुद्रा गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते‌…

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें