प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय खाद्यतेल अभियान”( तेलबिया) सन 2025 26 या योजनेअंतर्गत मौजे करंजाळा तालुका जिल्हा हिंगोली येथे बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथील शास्त्रज्ञ श्री राजेश भालेराव यांनी खरीप हंगामातील सोयाबीन सह विविध पिकातील खत व्यवस्थापन कसे करावे? तसेच जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन कापूस पिकातील कीड व रोग नियंत्रण याबाबत माहिती दिली तर मंडळ कृषी अधिकारी श्री कमलाकर सांगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हुमणी अळी नियंत्रण व खरिपातील विविध पिकावरील किड व रोग नियंत्रण तसेच कृषी विभागातील विविध योजना याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले संबंधित प्रशिक्षणास गावच्या सरपंच श्रीमती दुर्गा जनार्दन जाधव , उपसरपंच श्रीमती कांता विष्णू बंदुके, श्री रामकिसन बंदुके ,दगडू गिरी, सर्जेराव डुकरे यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाची नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती गंगोत्री बर्गे यांनी केले













