प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची 81 वी जयंती ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके होते. त्यांच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सर्वांना ‘सद्भावना दिवसाची शपथ’ दिली. याप्रसंगी प्रा. सुभाष मापारी, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. विजय कांबळे, प्रा. मधुकर लेमले, प्रा. श्याम खर्जुले, डॉ. के. एल. पुरी, डॉ. वाय. एम. काशीदे, डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. संभाजी चौतमाल, डॉ. एल. डी. गलंडे, प्रा. रजत सातपुते, प्रा. सुरज बेले, प्रा. कोल्हे, प्रा. एस. ए. चव्हाण
तसेच श्री. संजय डाके, श्री. गजानन शिंदे, श्री. भिमसंदेश दिपके, श्री. किरण लोडे, श्री. महेंद्र दिपके व विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.













