April 20, 2026 5:26 am

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची करमोडी उंचाडा शिवारात भेटी

प्रतिनिधी नांदेड भगवान कदम

… मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्याला आलेल्या पुराने थैमान घातले असून शेती सह पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस सुरू असताना हदगाव तालुक्यातुन जात असलेल्या नदीत ईसापुर धरणाचे दरवाजे उघडले असल्याने नदीच्या काठावरील पिकासह गावातील वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवार विस आगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री वाशीम जिल्ह्यचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशीम दौरा करून हदगांव तालुक्यातील अतीवृष्टीग्रस्त भागातील करमोडी उंचाडा शिवारात भर पावसात भेटी दिल्या.यावेळी आमदार कोहळीकर माजी खासदार वानखेडे यांनी तालुक्यातील नुकसानीची माहिती देत तात्काळ मदतीची मागणी केली.यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थितांना सरकार नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन देत जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी खासदार सुभाषराव वानखेडे,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , जिल्हा कृषी अधिकारी डॉ .निलकुमार महाविर ऐतवडे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार सुरेखा नांदे, गटविकास अधिकारी कैलास बळवंत , तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, एकनाथ पाटील,अनील पाटील बाभळीकर, तातेराव वाकोडे पाटील, संदेश पाटील हडसणीकर , शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शितल भांगे पाटील,निळु पाटील कल्याणकर, अमोल पाटील रुईकर, व्यंकटेश पाटील निर्मल, बबनराव माळोदे, अक्षय पवार बामणीकर, तालुका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी वर्ग राजकीय क्षेत्रातील मंडळी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें