April 20, 2026 1:26 am

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदाची धुरा बद्रीनाथ जगताप यांच्या खांद्यावर

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली:- भांडेगाव येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले बद्रीनाथ उत्तमराव जगताप यांची मंगळवारी 16 सप्टेंबर रोजी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड आमदार तानाजीराव मुटकुळे व भाजपा हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्या आदेशाने भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

बद्रीनाथ जगताप हे मागील दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत त्यांनी या अगोदर विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यात संघटन उभे करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला व कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवल्या याचीच पोचपावती म्हणून त्यांना भाजपच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करून पक्षाने मोठी जिम्मेदारी सोपवली आहे त्यांच्या या निवडीमुळे युवा मोर्चाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अरुणजी पाठक भाजपचे पूर्व हिंगोली जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांबाळे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें