हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे
हिंगोली :आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर संस्थेची सचिव श्री अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेक भैय्या बेंगाळ,मुख्याध्यापक श्री शिंदे आर.बी.,श्री सरकटे व्ही.एस.,पर्यवेक्षक श्री कसाब सर,परीक्षा विभाग प्रमुख श्री चोपडे सर, बाळासाहेब शिंदे वटकळी,बापूराव कांबळे,महेंद्र कांबळे पोलिस पाटील व परिसरातील पालक हे उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक श्री माटे सर यांनी केले माटे सरांनी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच संस्थेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांचा साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा यांनी सुंदर असे देशभक्तीपर गीतांचे गायन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कै. लखन सर्जेरावा नाईक इंग्लिश स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन यावर आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच अध्यक्षीय समारंभामध्ये श्री बेंगाळ साहेबांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.यावेळी सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमांसाठी सर्व कर्मचारी, परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.













