हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली : जिल्ह्यातील येलदरी धरणात सध्याच्या स्थितीत ९१. ८५% पाणीसाठा आहे कोणत्याही क्षणी येलदरी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील अशी माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाने दिली आहे नदीपात्रात कोणीही उतरू नये किंवा जनावरे नदीपात्रात सोडू नये असे आवाहन पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणात पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत गत ६७ दिवसांमध्ये तब्बल ३४६ दशलक्ष घनमीटर एवढे नवीन पाणी दाखल झाले आहे. धरणात ९१ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला असून पुढील वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाळ्याच्या यावर्षीच्या सुरुवातीला धरणात ४९ टक्के साठा शिल्लक होता. त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ९३४ दशलक्ष घनमीटर एवढी असून आज धरणात ८६१.३९३ दशलक्ष घनमीटर एवढा एकूण पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातील मृत पाणीसाठा सोडता येलदरी धरणाची उपयुक्त पाणी साठवणक्षमता ८१० दशलक्ष घनमीटर एवढी असून त्यापैकी येलदरी धरणातील वाढलेला जलसाठा आज धरणात ७३६. ७२३ दशलक्ष घनमिटर एवढे पाणी उपलब्ध झाले आहे सध्याच्या स्थितीत येलदरी धरणाची ९१टक्के धरण भरले आहे
येलदरीतून परभणी, हिंगोली व नांदेड या तीन जिल्ह्यांतील सिंचनासाठी पाण्याचा वापर होतो. धरणातील आजची आवक पाहता पुढील वर्षभरासाठी या तिन्ही जिल्ह्यांतील पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. हे धरण १०० टक्के भरून वाहण्याची शक्यता आहे.
*खडकपूर्णातून आवक सुरू*
पूर्णा नदीवर बुलढाणा, येलदरी आणि सिद्धेश्वर अशी एकूण तीन धरणे असून ही तिन्ही १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. यातील येलदरी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या खडकपूर्णा धरणाच्या १९ दरवाजांपैकी तीन धरणांतून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे येलदरी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आता येलदरी धरण देखील 100% भरण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी येलदरी धरणाचे दरवाजे उघडण्यात येथील माहिती पूर्ण पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे
धरण पाणीपातळी (सध्या स्थिती)प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता (दलघमी) मृत पाणीसाठा १२४.६७०
जिवंत पाणीसाठा ८०९.७७०
एकूण पाणीसाठा ९३४.४४०
आजचा पाणीसाठा तपशील (दलघमी) मृत पाणीसाठा १२४.६७०
जिवंत साठा ७३६,७२३
एकूण साठा ८६१.३९३
पाणीपातळी ४६१.०५०
मागील २४ तासांत आवक १०.२४४
टक्केवारी जिवंत साठ्याची ९०.९८विद्युतनिर्मिती केंद्र द्वार विसर्ग निरंक मुख्य द्वार विसर्ग निरंक













