सेनगाव प्रतिनिधी कचरु हरणे
हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथे दि,8, रोजी सकाळी 7 वा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अतिवृष्टी चालू आहे पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे व साखरा बस स्टॅन्ड ते गावठाण रोड नुकताच झालेला आहे रोडच्या गुत्तेदाराने शेतामधल्या येणाऱ्या पाण्याला पूल न बनवता थातूरमातूर फुल बनवून पाण्याचा विसर्ग काढला पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहे पाच फूट रुंदी नाली मध्ये पन पाणी बसत आणि त्या जागी दोन फुटाची नाली केलेली आहे त्यामुळे व्यापारी बंधुन च्या दुकानाने पाणी शिरत आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गावकऱ्यांची व्यापाऱ्यांची एकच इच्छा आहे आमदार तानाजी साहेब मुटकुळे साहेबांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन पाण्याचा विसर्ग कसा काढायचा चर्चा करावी अशी अपेक्षा व्यापाऱ्याकडून होत आहे













