April 20, 2026 6:11 am

हिंगोली रेल्वेस्थानकारवर उभ्या असलेल्या रेल्वे डब्याला आग, आगीचे कारण आद्यप अस्पष्ट

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे

हिंगोली येथील रेल्वेस्टेशनवरील उभ्या डब्याला आग लागल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत एक डबा संपूर्णतः जळून खाक झाला. हिंगोली येथील रेल्वेस्टेशनवर मागील काही महिन्यांपासून तीन रेल्वे चे डब्बे उभी आहेत. यातील एका

डब्याला बुधवारी सकाळी अचानक आग लागली.या रेल्वेच्या डब्यातुन आगीचे लोट आणि धूर बाहेर निघत असल्याचे रेल्वेस्टेशनवरील अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग भडकत असल्यामुळे न.प.च्या अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटात अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. परंतु, एका बंबातील पाणी संपले तरी आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे दुसरा बंब मागविण्यात आला. अग्निशमन विभागाच्या सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें