April 20, 2026 2:49 pm

*नागपंचमी विशेष :हिंगोली जिल्ह्यातील हजारो सापांना जिवनदान देणार अवलीय*

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे 

हिंगोली :महादेवाच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे एक प्रतीक नाग आहे तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे आज नागपंचमी विशेष अशातच आम्ही तुम्हाला एका गावची गोष्ट सांगणार आहेत

मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक छोटसं कहाकर बुद्रुक नावाचं गावं आहे. या गावची लोकसंख्या जवळपास तीन ते चार हजारच्या आसपास आहे. विदर्भ व मराठवाडा सीमेच्याजवळ असलेलं हे गाव आहे. गावांतील जमीन ही बारमाही ओलीताची असून इथे नेहमी हिरवळ असते. तीनही ऋतूम शेतकरी शेतात पिक काढतात. हिरवळ आल्यामुळे या गावात सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र,. या गावकऱ्यांनी आत्तापर्यंत एक सुद्धा साप मारला नाही

*आत्ता पर्यंत पाच हजाराच्या सापाला दिले जिवन दान*

गावात उच्च शिक्षित असलेले डॉक्टर भास्कर विनायकराव पोपळघट या तरुणांनी सापाबद्दल गावकऱ्यांची भीती दूर केली व स्वतः प्रशिक्षण घेऊन आतापर्यंत तब्बल पाच हजाराच्यावर सापांना जीवदान दिलं आहे. भास्कर पाटील हे

एक डॉक्टर असून ते 1998 पासून वन्यजीव तसेच सर्प रक्षणासाठी काम करतात. जिल्ह्यातील कुठेही साप निघाल्यास ते त्वरित, सर्वच कामे सोडून साप पकडण्यासाठी जाता त्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडून देतात.

त्याचसोबत ते प्रत्येक व्यक्तीला सापाबद्दल माहिती सांगतात आज साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे, असे मार्गदर्शन करतात.

आज मुक्या प्राण्यांना व सापांना वाचवण्याचा त्यांनी वसाच हाती घेतला आहे. त्यांच्या गावात

तसेच आजूबाजूच्या 20 किमी परिसरात कोणीच सापाला मारत नाही, साप कुठे दिसला तरी तर मला फोन लावा किंवा आपल्या परिसरातील सर्प मित्रांना बोलवा म्हणजे सापाचे प्राण वाचतील आणि सापामुळे जनतेलाही काही त्रास होणार नाही. डॉक्टर भास्कर पाटील यांनी जयपूर येथील पाच मुलांना साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या पाच मुलांनी जवळपास 2 हजार सापांना जीवनदान दिलं आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें