April 20, 2026 2:47 pm

औंढा नागनाथ येथील मंदिरात आठवे ज्योतिर्लिंग प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

औंढा नागनाथमध्ये घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष

हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील बारापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथांच्या दर्शनासाठी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते. कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर व गोदावरी बांगर यांनी प्रभू नागनाथाची सपत्नीक महापूजा केली व दुग्धाभिषेक केला. मध्यरात्रीनंतर दोनला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. मराठवाड्यासह विदर्भ व राज्याच्या अन्य भाविकांनी दर्शन घेतले. अनेक भाविक अनवाणी मंदिरात दाखल झाले होते.दिंड्या, कावड यात्राही आल्या होत्या. ‘हरहर महादेव’, ‘बम बम भोले’, ‘नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने मंदिर परिसर दिवसभर दुमदुमून गेला.

या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना नागनाथ महादेवाच्या दर्शनासाठी पश्चिमद्वारातून आत प्रवेश दिला जात असून भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरात दर्शन झाल्यानंतर परत बाहेर निघण्यासाठी पश्मिच, पूर्व व उत्तर दरवाजे उघडे केले जाणार आहेत. तर दर्शनासाठी उत्तरद्वाराकडून विशेष पास दर्शन सुरु केले जाणार आहे. भाविकांना दानशुरांच्या मदतीने दर्शन रांगेत चहा, पाणी, साबुदाणा खिचडीचे वाटप केले देखील करण्यात आले आहे.

*पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त*

दरम्यान, मंदिर परिसरात सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. या भागात अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, औंढ्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके

कार्यरत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या शिवाय मंदिर परिसरात ४२ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून या माध्यमातूनही गर्दीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी दिल्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें