April 20, 2026 10:11 am

वसमत औंढा रस्त्यावर किन्होळा पाटीजवळ टेम्पो दुचाकीचा अपघातात दोघांचा मृत्यू

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली :वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर किन्होळा पाटीजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि 15/07/2025रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातातील मयत दोघेही वसमत येथील मंगळवारपेठ भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील मंगळवारपेठ भागातील रहिवासी असलेले अंकुश महाजन जैन हा त्याचा मित्र शुभम महाजन याच्यासह दुचाकी वाहनावर आज दुपारच्या सुमारास औंढा नागनाथरकडून वसमतकडे निघाला होते. त्यांचे दुचाकी वाहन वसमत पासून काही अंतरावरच असलेल्या किन्होळा पाटीजवळ आले असतांना वसमतकडून औंढा नागनाथकडे टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अंकुश व शुभम दोघेही गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार भगवान आडे, रामा लोखंडे, आंबादास विभुते, शहाजी बामणीकर, विजय वऱ्हाडे, विजयकुमार उपरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. दरम्यान, मयत अंकुश महाजन हा खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चायत दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. तर मयत शुभम महाजन हा खाजगी विमा कंनपीचा एजंट म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही मयतांच्या नातेवाईकांना रुग्णालयात गर्दी केली होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें