हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली:- लातूर या ठिकाणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान भवन मध्ये रम्मी खेळून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेध करण्याकरिता छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे हे काल दिनांक. २०\०७\२०२५ सुनील तटकरे यांना निवेदन देण्याकरिता गेल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली याच्या निषेधार्थ तसेच सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करून कङक कारवाई करावी
व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर रम्मी खेळून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या अशा कृषीमंत्री यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा याकरिता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कनेरगाव-जिंतूर महामार्ग सुरु केला पार्टी या ठिकाणी अडवला होता यावेळी त्यांनी टायर जळत मोठी घोषणाबाजी केली
यावेळी गजानन कावरखे (क्रांतिकारी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष) नामदेव पतंगे, शांतीराम सावके, संतोष सावके, राहुल कावरखे आधी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला सुद्धा उपस्थित होत्या…..













