April 20, 2026 10:20 am

नरसी नामदेव मध्ये अवतरणार प्रति पंढरपूर परतवारी सोहळ्यासाठी नरसी नामदेव नगरी सज्ज वॉटरप्रूफ मंडपात होणार हरिनामाचा गजर

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

हिंगोली,जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथे सोमवारी (दि २१) परतवारीनिमित लाखो भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी संस्थान प्रशासनाने जय्यत तयारी केली. या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात केल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. वारकरी कामिका एकादशीच्या दिवशी नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी येत असल्याने या वारीला परतवारी म्हणून ओळखले जाते

सोमवारी कामिका एकादशी असल्याने येथे परतवारी आहे. यामुळे येथे लाखो भाविक दर्शनासाठी येणार असल्याने मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप येणार आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सायंकाळी सोपान महाराज सानप शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे. सर्व भाविकांना चहा, पाणी, शाबुदाणा खिचडी, फराळाची व्यवस्था केली. यासाठी संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सचिव द्वारकरदास सारडा, भिकुलाल बाहेती, गिरधारीलाल तोष्णीवाल, रमेश महाराज आदी पुढाकार घेत आहेत. दरम्यान, पावसाचा अंदाज पाहून येथे तीन वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले. एक मंडप शंभर बाय शंभर, दुसरा साठ बाय 140तर तिसरा 30 बाय 150 असा मंडप उभरण्यात आला सोमवारी सकाळी सातला आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, संस्थानचे पदाधिकारी ओमप्रकाश हेडा. भिकाजी कदम, भिकुलाल बाहेती यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता वॉटप्रूफ मंडप उभारण्यात आला. दोन धर्मशाळा खुल्या केल्या. भाविकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरीसह विदर्भातील रिसोड आगाराला पत्र देऊन जादा बस सोडण्याची मागणी करण्यात आली असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, आरोग्य विभागाच्या वतीने येथे दिवसभर सेवा देण्यात येणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें