April 21, 2026 9:51 am

हिंगोली येथील सेवासदन मुलांची वसतीगृह येथे अ.भा.ग्रा.प.सं. प्रदेशाध्यक्ष कैलासराव बापु देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त पेन व खाऊ चे वाटप

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने संघटनेचे केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसाच्या निमित्याने राज्यभरात २२ जून पासून विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.याच उपक्रमाचे नियोजनातून संघटनेचे केंद्रीय संपर्कप्रमुख प्रा.रवींद्र मेंढे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, बाबाराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ३० जूनला हिंगोली येथील सेवासदन मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश सचिव गोपालराव सरनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रतील सर्व जिल्हामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यात सुद्धा हिंगोली जिल्हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणी तर्फे कैलासराव बापू देशमुख,प्राध्यापक रवींद्र मेंढे, बाबाराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवासदन मुलांची वसतीगृह या ठिकाणी पेन व बिस्किट खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश सचिव गोपालराव सरनायक जिल्हाध्यक्ष संदीप घुगे, गजानन देशमुख, रमेश आढळकर, सुरेश पाईकराव यांच्यासह सेवा सदन चे संचालक धनराज कदम व श्रीमती मीराताई कदम यांच्यासह अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें