प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे सार्वजनिक नवदुर्गा मंडळाचे वतीने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी ह भ प गणेश महाराज कऱ्हाळे, दिनांक 23 सप्टेंबर रोजी ह भ प नामदेव महाराज कऱ्हाळे, दिं24 सप्टेंबर रोजी ह भ प दिपाली शिंदे सावा, दिनांक 25 सप्टेंबर रोजी ह भ प गिरजाबाई टवले जवळा, दिनांक 26 सप्टेंबर रोजी ह भ प शितलताई तांदळे परभणी, दिनांक 27 सप्टेंबर रोजी ह भ प वेनु ताई वाळके मंगलवाडी, दिनांक 28 सप्टेंबर रोजी ह भ प शितलताई दळवी पूर्णा, दिनांक 29 सप्टेंबर रोजी ह भ प रुपालीताई पवणेकर हदगाव, दिनांक 30 सप्टेंबर रोजी ह भ प कान्होपात्रा शिंदे दाताडा, दिनांक 1 सप्टेंबर रोजी ह भ प स्वातीताई घ्यार साटंबा, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी ह भ प निर्गुणा ताई परभणी, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी ह भ प रामकिशन महाराज कऱ्हाळे, यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तन महोत्सवामध्ये मृदंगाचार्य गणेश महाराज खांडेकर संतुक पिंपरी, हनुमान भजनी मंडळ,माऊली भजनी मंडळ तसेच गायनाचार्य नामदेव महाराज नरवाडे दाटेगाव यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमांमध्ये राहणार आहे. सार्वजनिक नवदुर्गा मंडळाच्या वतीने दररोज सकाळी सायंकाळी अभय महाराज यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम घेण्यात येत असतो.
दिनांक 1 ऑक्टोबर रोज बुधवार रोजी हनुमान मंदिर प्रांगणामध्ये होम हवन, व दुपारी महाप्रसादाची भव्य पंगत होणार आहे. सार्वजनिक नवदुर्गा मंडळाच्या वतीने दररोज धार्मिक कार्यक्रम होत असल्याने गावांमध्ये धार्मिक वातावरण दिसून येत आहे.













