April 20, 2026 1:26 am

विद्यार्थिनींनी साकारली नवदुर्गाची नऊ रूपातून प्रतिकृती पवार पब्लिक स्कुल मध्ये गरबा, दांडिया उत्सव साजरा

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली येथील पवार पब्लिक इंग्लिश स्कुल च्या वतीने रविवारी राष्ट्रवादी भवनात घेण्यात आलेल्या गरबा, दांडिया उत्सवात विद्यार्थिनींनी नवदुर्गाची हुबेहूब नऊ प्रतिकृती साकारल्याने उपस्थित नागरिकांकडून विद्यार्थिनीचे कौतुक केले जात होते.

शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मंदाताई पवार, प्रीती पवार, संचालक प्रणव पवार सर, उत्सवात विविध उपक्रम राबवीत असतात, त्यामुळे पवार पब्लिक स्कुलने जिल्ह्यातील इंग्रजी शाळेत वेगळा पायंडा पाडल्याने विद्यार्थी, पालक वर्गात शाळेबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नाईक नगर येथील राष्ट्रवादी भवनात रविवारी दांडिया, गरबा उत्सव दरवर्षी प्रमाणे यंदा ही घेण्यात आला. या गरबा दांडिया उत्सवात शाळेतील, विद्यार्थिनी, विद्यार्थी पालक यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला, शाळेतील शिक्षकांनी देखील नवरात्र उत्सव सुरु असल्याने नऊ देवींची रूपे विद्यार्थिनी कडून साकारून घेतल्या. कोणी शैलपुत्री तर कोणी दुर्गा, महाकाली, कात्यायनी, चामुंडा, सरस्वती, अशी नव रूपे सादर करून उपस्थितीत्यांची मने जिंकली.

यावेळी शिक्षिका कोमल अग्रवाल, दीपाली राऊत, सॉलि के. सी, अश्विनी सराफ, अपर्णा मुळे, रुपाली ठाकरे, दीपाली हजारे, छाया धनवे, फिजा सय्यद, छायाबाई कल्याणकर, शशिकला मोरे, सचिन धामणे पंकज इंगोले, सचिन इंगोले, योगेश थोरात, जॉबइन जॉर्ज, गजानन वानरे, वैभव काळे, विकास महानोर, आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें