April 20, 2026 1:07 am

हिवरखेडा येथील पुरवठा निरीक्षक अधिकारी शिवाजी गायकवाड यांचे निधन

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथील शिवाजी सदाशिव गायकवाड वय 35 वर्ष यांचे दिनांक 15 /09 /2025 रोजी छत्रपती संभाजी नगर येथील सिग्मा हॉस्पिटल येथे रात्री नऊ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले गेल्या महिनाभरापासून ते सिग्मा

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते

शिवाजी सदाशिव गायकवाड यांच्या गेल्या आठ वर्षांपूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या तेव्हा त्यांच्या आईची किडनी त्यांना ट्रान्सफर करण्यात आली होती ही किडनी ट्रान्सफरची मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार देखील पडली होती तब्बल आठ वर्ष त्यांनी आपल्या आईने दान केलेल्या किडनीवर जीवन देखील जगले आहे मात्र गेल्या महिनाभरापासून किडनीचा प्रॉब्लेम होऊ लागल्याने त्यांनी सिग्मा हॉस्पिटल येथे उपचार सुरू केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागात ते पुरवठा निरीक्षक अधिकारी होते वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी ते आपल्यातून आज निघून गेले आहेत त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ, बहिणी, पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें