April 20, 2026 1:13 am

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2025 गुणपत्रक वाटपाचा कार्यक्रम हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने घेण्यात आला

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली दिनांक 17/9/025 महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ग्रंथालय संचालनाय मार्फत घेण्यात येणारा ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2025 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वाटपाचा कार्यक्रम नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या सभागृहामध्ये घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ छत्रपती संभाजी नगर चे अध्यक्ष श्री खंडेराव सरनाईक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक ग्रंथालय निरीक्षक मिलिंद सोनकांबळे श्री अशोक अर्धापूरकर प्रा. जी पी मुक्कलवार प्रा. विजय जयस्वाल श्री गजानन शिंदे श्री विनोद कावडे श्री विश्वनाथ डोंगरे श्री संतोष ससे हे होते सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पहारणे व ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले.महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनाकडून डिसेंबर2024 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून हिंगोली केंद्राचा निकाल 78% लागला आहे 

हिंगोली जिल्ह्याने शासनाच्या सदर अभ्यासक्रमासाठी गुणवत्ताची उत्तम परंपरा कायम ठेवली आहे. हिंगोली केंद्रातून प्रथम कु. शितल सोमनाथआप्पा तडकसे, द्वितीय आहेर मोहन दत्तराव, तृतीय राऊत किरण महादेव हे आले आले असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वाटप करून अभिनंदन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व विभागीय मराठवाडा विभाग संघाचे अध्यक्ष श्री खंडेराव सरनाईक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री आशिष ढोक श्री मिलिंद सोनकांबळे प्रा. जी पी मुकुलवार श्री अशोक अर्धापुरकर प्राध्यापक विजय जयस्वाल श्री गजानन शिंदे श्री विनोद कावडे श्री विश्वनाथ डोंगरे श्री संतोष ससे श्री देवीदास देशमुख डॉ. विलास खरात श्री सुधाकर जाधव श्री नामदेव दळवी ज्योती पाटे श्री सिद्धलिंग कीर्तनकार श्री दत्तराव पोहरे यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें