April 20, 2026 10:24 am

शेकडो हेक्टर वरील पिके पाण्यात.

प्रतिनिधी सुधाकर डुकरे कनेरगाव (ना)

हिंगोली तालुक्यातील गत चार दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत पैनगंगा नदीला महापूर आला, त्यात odhya- नाल्यांनाही पूर आल्याने पाणी शेत शिवारात शिरले. परिणामी पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी कनेरगाव नाका या परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे.

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका परिसरा सह कानरखेडा खुर्द, कानरखेडा बुद्रुक, वाढोणा ,कलबुर्गा, सवना, फाळेगाव मोप आदी गावांमध्ये 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. चार दिवसांच्या सततधार पावसामुळे ओढे – नाले तुडुंब भरून वाहू लागले तर पैनगंगा नदीला महापूर आल्याने आणि शेतशिरात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील हळद ,सोयाबीन, तूर ,मूग ,उडीद, भाजीपाला यासह विविध पिके पाण्याखाली गेली, अनेक ठिकाणी पिके जमिनी सकट वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेकडो हेक्टर वरील पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, सध्या शेतकऱ्यांचे सर्वस्व पिकावर अवलंबून असल्याने सरकारने तातडीने मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें