प्रतिनिधी सुधाकर डुकरे कनेरगाव (ना)
कनेरगाव नाका येथून आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी पायदळ दिंडी शेगावकरिता निघाली. मागील 26 वर्षापासून हनुमान संस्थांन कनेरगाव नाका ते शेगाव पायदळ दिंडी जय गजानन चा नाम घोषात महिला- पुरुष व भजनी मंडळी सह शेगाव येथे रूषीपंचमी ला शेगाव येथे पोहोचते. दिंडीचे व्यवस्थापक ह भ प किसनराव गावंडे तसेच नवनाथ गावंडे ,शिवा गावंडे मानदार , बबन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून मिरवणूक काढून नंतर दिंडी शेगाव कडे प्रस्थान झाले. दिंडी सोबत भजनी मंडळी व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.













