हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथे 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेडी पिन गाळे येथे स्वतंत्र भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन आज अतिशय दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी लेझीमच्या तालावर गावातून काढलेल्या प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रभातफेरीतील नाविन्यपूर्ण सादरीकरण पाहून ग्रामस्थांमध्ये देशभक्तीचा उन्मेश पसरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमापूजन श्रीमती मंगलाताई पिनगाळे (सरपंच), श्रीमती सुशीलाबाई वाकळे व बालू राठोड (ग्रामपंचायत सदस्य) यांच्या हस्ते पार पडले. ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. पुंड आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष . बाळासाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापकांनी प्रास्ताविक करून शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर इयत्ता 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे करून उपस्थितांना देशभक्तीची प्रेरणा दिली.
गावातील ग्रामस्थाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेला दान व भेटवस्तू नारायण पांडुरंग पिनगाळे व. भारत दादाराव मोहिते यांनी संगणक संच शाळेला भेट दिला. व विक्रम विष्णू मोहिते, रामदास उत्तम काळे, नागेश प्रल्हाद पिनगाळे आणि . अजय भारत पिनगाळे यांनी प्रत्येकी 1 फळा (एकूण 4) फळे भेट दिले. उकंडी राजाराम पिनगाळे यांनी आपल्या मुलगा . विजय उकंडी पिनगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त १ फळा भेट दिला. विष्णू गणपत मोहिते यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास 1 वही व 1 पेन देण्याची घोषणा केली व हे साहित्य दरमहा पुरविण्याचे आश्वासन दिले.तसेच येत्या 26 जानेवारीला शाळेस 5001 /_ रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले..
या सर्व दानशूर व्यक्तींचा सत्कार श्री मती मंगलाताई पिनगाळे (सरपंच), संदीप पाटील पिनगाळे (पोलिस पाटील), मान्यवर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
*प्रतिक्रिया*
.आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेला आज आम्ही संगणक संच भेट दिला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अजून भर पडेल गावातील प्रत्येक ग्रामस्थांनी ज्या परीने होईल त्या परीने आपल्या जिल्हा परिषद शाळेला काही देण्याचा प्रयत्न करावा व आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा प्रगतशील कराव्यात द्यावी व गावातील ग्रामस्थांनी आपले मुले इंग्लिश स्कूल ला न टाकता आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेला टाकून याच शाळेत शिक्षण द्यावे व गावातील प्रत्येक नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेवर लक्ष ठेवावे शाळेत काही कमी आहे का शिक्षकांना काही अडचणी आहेत का व आपल्या पाल्याचे शिक्षण गावातील शाळेत करावे असे आवाहन नारायण पाटील पिनगाळे यांनी केले आहे













