April 20, 2026 9:59 am

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा…

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली जिल्ह्यातील

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष श्रीमती आनंदीताई बेंगाळ प्राध्यापक अभिषेक भैय्या बेंगाळ प्रमुख पाहुणे पत्रकार तथा कवी शिवाजीराव कह्राळे,उमेश चक्कर, खंडेलवाल साहेब,आवेश शेख, प्रदिप वाघ,गजानन देशमुख,केशव कापसे,नसीब भाई, इम्रान भाई, मंचकराव बेंगाळ, सय्यद शेरु,बाळासाहेब शिंदे,ज्ञानेश्वर सापनर, गजानन थिटे,विनोद धरणे,ओमकार पुरी, संदीप साळवे, गुलाबराव वाव्हळ, भुजंग बिडकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे आर.बी.श्री सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर परीक्षा विभाग प्रमुख श्री चोपडे सर तसेच चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा केकत उमरा यांनी देशभक्तीपर गीत गायन केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या समारोपीय मनोगत मधून श्री भास्कर बेंगाळ साहेबांनी ही संस्था यशाचे शिखर गाठले.यावर्षी बी.सी.ए. व बी.-डिझाईन हे नवीन कोर्स आपल्या संस्थेत सुरू झाले आहेत.यापुढे नवीन कॉलेज आपल्या संस्थेत सुरू होतील व यापुढे नवीन बी.एच.एम.एस. कॉलेज सुद्धा लवकरात लवकर संस्था सुरु करणार आहे.यावेळी सुत्रसंचालक श्री आर.बी.शिंदे सर यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें