April 20, 2026 5:58 am

न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे कार्यक्रम

 प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची 109 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील कॉमर्स विद्याशाखेचे विभागप्रमुख प्रा. सुभाष मापारी होते. त्यांच्या हस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. तसेच पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ ही शपथ डॉ. पवन वासनिक यांनी सर्वांना दिली. उपस्थित सर्वांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी प्रा. बी. बी. चव्हाण, डॉ. सुनिल हजारे, डॉ. पवन वासनिक, प्रा. विजय कांबळे, प्रा. मधुकर लेमले, प्रा. श्याम खर्जुले, डॉ. वाय. एम. काशीदे, डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. संभाजी चौतमाल, प्रा. रजत सातपुते, प्रा. सुभाष चव्हाण, प्रा. गोरे, प्रा. शिर्के, प्रा. कोकाटे

तसेच श्री. गजानन शिंदे, श्री. संभाजी चौधरी, श्री. राजेंद्र केदारे, श्री. किरण लोडे, श्री. रामचंद्र अंकुशकर, श्री. शेरु, श्री. महेंद्र दिपके, विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें