April 20, 2026 1:16 am

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची कनेरगाव परिसरात नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी,

प्रतिनिधी सुधाकर ढुकरे कनेरगाव (ना)

पैनगंगा नदीच्या महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले,

कनेरगाव नाका येथे दिनांक 25 /9 /2025 रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजेच्या दरम्यान मंत्री भुसे साहेब व इतर अधिकारी तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह शेतकरी प्रमोद गावंडे यांच्या शेतात पोहोचले पुराच्या पाण्यामुळे खरडून गेलेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, नदीकाठच्या शेतकऱ्यांचे खरडून गेलेल्या शेतीचे दोन दिवसात पंचनामे करून सादर करा व त्यांना तात्काळ वेगळी मदत देण्यात येईल असे सांगितले यावेळी शेतकरी बांधव श्रीरामचंद्र पाटील गावंडे, माधवराव ठोंबे ,प्रमोद गावंडे ,अभिषेक गावंडे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें