हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
*आज १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मूद्देमाल सूपूर्त*
हिंगोली : जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यांमध्ये पोलीस अधीकार्यांनी हस्तगत केलेले तोळे सोन्याचे दागिणे व काही रोकडसह असा लाखोचा ऐवज मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्ताने सेनगावचे पोलीस अधिकारी एपीआय दिलीप मस्केयांच्याहस्ते फिर्यादी मुळ मालकांकडे सुपुर्द करण्यात आला. त्यामुळे आपला चोरीस गेलेला ऐवज परत मिळाल्याने संबंधीतांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करत तपासकामी परिश्रम घेणार्या सेनगाव पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील सालगडी ते उद्योजक अर्थात आदित्य नर्सरीचे संचालक संतोष शिंदे यांचे घरी ७ फेब्रुवारी २०२५ रोजी घर फोडून दागीण्यासह लाखोंचा एवज लंपास केला होता शुक्रवारी ७ रोजी रात्री शिंदे कुटुंबीय जेवण करून झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी शिंदे कुटुंबीय झोपलेल्या खोलीची बाहेरून कडी लावली. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या खोल्यांमध्ये प्रवेश करून साहित्य अस्ताव्यस्त करत त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडून लोखंडी पेटी मधील सुमारे ४ लाख ६७ हजार ३९४ रू सोन्या दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. सदर घरच्यांना चोरी झाल्याची लक्षात येताच सेनगाव पोलीस विभागाला संपर्क करून स्वान व पोलीस पथक घटनास्थळी पोहचून पंचनामा केला सदर पोलीस विभागाने शिताफिने वेगवान चक्र फिरवली आणि ४८ तासात आरोपींना अटक केली आणि गून्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला सदर सोन्याचे दागिने व रोकड पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ मालक संतोष शिंदे यांच्याकडे मुक्ती संग्राम दिनानिमित्त सुपुर्द केला आदित्य नर्सरीचे संचालक संतोष शिंदे यांनी कर्तव्यदक्ष काम करणाऱ्या एलसिबी आणि सेनगाव पोलिस अधिकारी एपीआय दिपक मस्के पी एस आय रामकिशन खंदारे,पी एस आय नागनाथ पाटील, राजेश जाधव साहेब,वंजारे साहेब, चव्हाण साहेब, पठाण साहेब,रिथे साहेब,मारकळ साहेब, सर्व काम करणार्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले













