प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली.. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयात विजेत्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत कु. पल्लवी केशव पांचाळ व कु. नेहा सुभाष मस्के या दोन विद्यार्थ्यींना कांस्य पदक मिळाले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. सुरज बेले, प्रा. डॉ. अतिश कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना मा. प्राचार्य डॉ. एन. एस. सोळंके सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, बौद्धिक व क्रीडा प्रकारात सहभाग घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन काळबांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल अवचार यांनी केले. याप्रसंगी प्रा. सुनिल पाटील, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. विजय कांबळे, डॉ. वाय. एम. काशीदे, प्रा. गोरे, श्री. गजानन कऱ्हाळे, श्री. बांगर, श्री. किरण लोडे, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.













