April 20, 2026 5:58 am

पैनगंगा इंटरनॅशनल स्कूल तर्फे शंतनु कोंघे यांचा सत्कार.

कनेरगाव(नाका)प्रतिनिधी सुधाकर ढुकरे

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील पैनगंगा इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी शंतनू जगन कोंघे या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) मध्ये लेखणीय यश संपादन केल्याबद्दल पैनगंगा इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने त्याचा शाळेत पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला .शंतनू कोंघे याने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवून अंबाजोगाई येथील शासकीय एमबीबीएस कॉलेजला मोफत प्रवेश मिळवला त्याबद्दल सुद्धा त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .त्यांच्या यशामागील सातत्यपूर्ण परिश्रम शिस्तबद्धता अभ्यास आणि कुटुंबीयाचे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन हे मुख्य घटक असल्याचे शंतनू कोंघे आपल्या या सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उद्धवराव इंगोले व शिक्षक -शिक्षिका -पालक व विद्यार्थी – विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते . मुख्याध्यापक इंगोले यांनी शंतनु यांचे कौतुक करताना सांगितले की शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शंतनू हे एक प्रेरणास्त्रोत ठरले असून त्यांच्या यशामुळे शाळेचे नाव उज्वल झाले आहे . यावेळी शाळेतील शिक्षक – शिक्षिका यांनी शंतनुचे पुष्पगुच्छ देऊन गौरव केला . या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक – शिक्षिका यांनी केले शंतनु याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें