April 20, 2026 1:15 am

शिवाजी महाविद्यालयात मंगळवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली दि. 17 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व येथील शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने मंगळवार (दि. 22) रोजी शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात मुथ्थुट फायनान्स हिंगोली, उत्कर्ष स्मॉल बँक वाशिम, क्लासिक टीव्हीएस मोटर्स हिंगोली, नवभारत फर्टीलायझर लि. छत्रपती संभाजीनगर, पगारीया ऑटो प्रा.लि.हिंगोली, पलटन सेक्युरिटी हिंगोली, क्रिडेट एक्सेस ग्रामीण कुटा हिंगोली, भारत फायनान्स लि. हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, मारोती ऑटोमोबाईल हिंगोली, स्वतंत्र मायक्रो फायनान्स वाशिम अशा नामांकित कंपनी व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 250 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून ऑनलाईन अर्ज करून स्वत: मूळ कागदपत्रांसह शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे मंगळवार, (दि. 22) रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें