प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. ही शाळा पाचवी ते बारावीपर्यंत आहे. वर्ग खोल्या नसल्यामुळे दोन शिफ्ट मध्ये शाळा भरते. शाळा सकाळी लवकर भरते सायंकाळी सात तिस ला सुटते. शाळेच्या टायमावर एसटी महामंडळाच्या बसेस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला. तरी संबंधित एसटी आगर प्रमुखांनी शाळेच्या टायमावर बस सोडावी अशी शालेय विद्यार्थी यांची मागणी आहे.
तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी शाळा एका टायमात म्हणजेच एका शिफ्टमध्ये भरावी अशी सुद्धा मागणी समोर आहे.













