April 23, 2026 10:08 am

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची १५१ जयंती साजरी :- (न्यू माॅडेल डिग्री काॅलेज हिंगोली)

संपादक कृष्णा कऱ्हाळे TV24मराठी हिंगोली 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 26 जून 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके होते. त्यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी डॉ. सुनिल हजारे, डॉ. मोहसीन पठाण, डॉ. पवन वासनिक, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. विजय कांबळे, प्रा. सुरज बेले, प्रा. जुनेद शेख तसेच श्री. संजय डाके, श्री. गजानन शिंदे, श्री. संभाजी चौधरी, श्री. भिमसंदेश दिपके, श्री. रामचंद्र अंकुशकर, श्री. किरण लोडे, श्री. महेंद्र दिपके इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें