April 20, 2026 1:15 am

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा :- न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली

संपादक कृष्णा कऱ्हाळे TV24 मराठी हिंगोली        

स्वमी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक  21 जून 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या  वतीने  आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी आजच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीने  दररोज किमान 15  मिनिट योग करणे आपल्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी  डॉ. सचिन काळबांडे यांनी योगासनाचे प्रात्येक्षिक दाखवून सर्वांकडून योगासने करून घेतले. यावेळी डॉ. अतिश कदम, प्रा. विजय कांबळे, प्रा. एस. एस. काशिदे,  श्री. आशिष पतंगे, श्री. कैलाश बांगर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें