April 20, 2026 2:45 pm

हिंगोली जिल्ह्यातील साखरा तांडा येथील शेतकऱ्याच्या मुलाचा यूपीएससी डंका

 हिंगोली प्रतिनिधी/शिवशंकर निरगुडे 

हिंगोली :प्रचंड महत्त्वकांक्षा जिद्द चिकाटी आणि प्रयत्नांची पराकाष्टा या सर्व गुणांना आत्मसात करत मी जिंकणारच ध्येयाने प्रेरित झालेल्या आणि सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या साखरातांडा येथील अक्षय राठोड याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारतीय सशस्त्र सेना दलात वर्ग एक चा अधिकारी होण्याचा मान मिळवलेला आहे. प्रतिकुल आर्थिक परिस्थितीत सकारात्मक ध्येयाने कष्ट घेऊन यूपीएससी सारख्या खडतर परीक्षेत यश मिळवून अक्षय राठोड यांने जिल्ह्यातील युवकांच्या पुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे.अभ्यासात सातत्य महत्त्वाचे अक्षय राठोडने सांगितले की, ‘अभ्यासात सातत्य ठेवले, घरी राहूनच परीक्षेची तयारी केली आणि पहिल्या प्रयत्नातच यश संपादन केले. प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर यश निश्चित मिळते, असे त्याने सांगितले.

कोणतीही क्लास न लावता, घरीच अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत 284 रँक यश मिळवून सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा येथील अक्षय देविदास राठोड या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. साखरा तांडा हे दुर्गम भागातील गाव असून, येथे शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीतही अक्षयने स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत कोणतीही क्लास न लावता, घरीच अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवून सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा येथील अक्षय देविदास राठोड या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. साखरा तांडा हे दुर्गम भागातील गाव असून, येथे शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीतही अक्षयने स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले. सेवानिवृत्त शिक्षक देविदासराव राठोड यांचा अक्षय हा मुलगा. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हिंगोली व वसमत येथील नवोदय विद्यालयांमध्ये पूर्ण झाले. पुणे येथून विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली. एक वर्ष दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यानंतर, अक्षय घरी परतला आणि घरुनच त्याने अभ्यास सुरू केला. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अक्षय राठोड याची सशस्त्र 7 दलातील क्लास वन अधिकारी, असिस्टंट कमांडंट या पदावर निवड झाली आहे.

आज साखरा येथे ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले व गावातून मुख्य मार्गावरून त्याची मिरवणूक काढण्यात आली ठीक ठीक त्याचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या मूळ गावी राठोड कुटुंबाकडून आपला मुलगा अधिकारी झाल्यामुळे संपूर्ण गावाला नगर भोजन देखील देण्यात आले आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें