April 20, 2026 5:58 am

दरोड्याचा गुन्हा उघडकीस आल्याने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा सत्कार…

कृष्णा कऱ्हाळे संपादक TV24 मराठी हिंगोली

फ्लिपकार्ट पार्सल दरोडा प्रकरणी ८ जणांना अटक; एलसीबीच्या कामगिरीबद्दल हिंगोली येथील ईकार्ट कंपनी चे सर्व मॅनेजर मिळुन यांनी पोलीस अधीक्षक यांचा सत्कार केला.

हिंगोली – हिंगोली महामार्गावर फ्लिपकार्ट पार्सल कंटेनरवर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एलसीबी पथकाने अवघ्या 48 तासांत छडा लावत आठ जणांना अटक केली असून, सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फ्लिपकार्ट हिंगोली हबचे इन्चार्ज व पत्रकार राजू मगर, तसेच कर्मचारी विठ्ठल मस्के, विकीन दांडगे, महादेव नागरे आणि नानाराव घुगे यांनी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक मा. श्री. कृष्ण कोकाटे साहेब यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौ. अर्चना पाटील मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक शिवसांब घेवारे सर, तसेच एलसीबी टीमचे देखील विशेष आभार मानण्यात आले. एलसीबीच्या तात्काळ व प्रभावी कारवाईमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास व आदर निर्माण झाला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें