April 20, 2026 1:03 am

चोरट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातून चंदनाचे झाड पळवले हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

हिंगोली : येथील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निवासस्थानाच्या अंगणातील चंदनाचे झाड चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली. याकर सोमवारी (ता. ११) हिंगोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला शहरात रविवारी (ता. १०) राहुल गुप्ता यांच्या अंगणातील चोरट्यांनी चंदनाचे झाड तोडून नेले.दरम्यान, आज सकाळी ठिकाणी माळी काम करणारे शिवप्रसाद शिंदे हे आल्यानंतर त्यांना चंदनाचे झाड दिसले नाही. त्यांनी सदर प्रकार जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या कानावर टाकला. तसेच, शहर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार पोटे, अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शेख मुजीब यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन ते तीन जण झाडाच्या जवळ असल्याचे दिसून आले. मात्र, सीसीटीव्हीमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु झाले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें