April 20, 2026 5:30 am

पेट्रोल भरताना अचानकपणे स्कुटीने घेतला पेट हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील पेट्रोल पंपावरील घटना सुदैवाने जीवितहानी टळली

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे  

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथील कुमारेश्वर पेट्रोल पंपावर अचानकपणे स्कुटीने पेट घेतला यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही केलसुला येथील शेतकरी एकनाथ गिऱ्हे हे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या स्कुटी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले मात्र पेट्रोल भरताना त्यांच्या स्कुटीने अचानकपणे पेठ घेतला संबंधित पेट्रोल पंप मॅनेजर नामदेव नागुलकर व त्यांच्या टीमने तात्काळ फायर चालू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला चार सिलेंडर मध्ये आग आटोलुक्यात येत नव्हती त्यामुळे नामदेव नागुलकर यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून सदरील स्कुटी पेट्रोल पंपाच्या बाहेर ओढत नेली त्यामुळे यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली आहे

केलसुला येथील अपंग शेतकरी एकनाथ गिऱ्हे यांची ही स्कुटी होती गाडीच्या इंजिन मध्ये आग लागली त्यामुळे पेट्रोल पंप मॅनेजर नामदेव नागुलकर यांनी एकनाथ गिऱ्हे यांना गाडीच्या खाली उतरवून आग विझवण्याचा प्रयत्न केला पेट्रोल पंपावरील संपूर्ण स्टाफ यावेळी गाडीची आग विझवण्यासाठी समोर आला काहींनी फायर टेंडरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बाटलीमध्ये असलेल्या वाळू ने आगेवार नियंत्रण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे नागुलकर यांनी पेटत्या कुटीला धरून पेट्रोल पंपाच्या बाहेर नेले नागुलकर यांच्या या कार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे

ही स्कुटी पेट्रोल पंपाच्या बाहेर नेल्यावर लगेच मोठा स्फोट झाला व मोठा भडका उडाला हे सर्व घटना केलसुला येथील अपंग शेतकरी एकनाथ गिऱ्हे हे पेट्रोल पंपावर बसून पाहत होते अपंग असल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही हे सर्व घटना पाहून आपली गाडी जळाली ही पाहून त्यांच्या डोळ्यांमध्ये आश्रु आनावर झाले होते कुमारेश्वर पेट्रोल पंप येथील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि प्रसंगगावधानता दाखवल्याने मोठा अनर्थ टाळला आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें