April 20, 2026 5:30 am

महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या तिरुपती येथील पाच मजली भक्तनिवासाचे भूमिपूजन

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या तिरुपती येथील पाच मजली भक्तनिवासाचे भूमिपूजन हिंगोली( ११)(वृत विशेष)(डॉ.विजय निलावार) सामाजिक राष्ट्रीय व धार्मिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा च्या वतीने नांदेड येथे भव्य वासवी भवन साकारल्या नंतर लगेचच आता तिरुपती बालाजी येथे १०२ खोल्यांच, लोक सहभागातून आधुनिक भव्य भक्तनिवास निर्माणासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे. श्री सिताम्मा ट्रस्ट तिरुपती कडून ह्यासाठी एक एकर भूखंड महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेला अलीकडेच माजी खासदार टी.जी.वेंकटेश व विलास बच्चू आदींच्या हस्ते महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार,महासचिव गोविंदराव बिडवई,अनिल मनाठकर,संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार ,प्रदीप मनाठकर,बिपीन गादेवार,महासभा व बांधकाम समितीचे अन्य पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत रीतसर प्रदान करण्यात आली,त्याबद्दल सिताम्मा ट्रस्ट चे सर्वांनी अभिनंदन केले. बांधकामाच्या नियोजना प्रमाणे रीतसर ताबा, निविदा,आदी सर्व प्रक्रिया व सोपस्कार पूर्णत्वास नेऊन २० ऑगस्ट २०२५ रोजी आधुनिक पद्धतीच्या पर्यावरण पुरक प्रणालींचा वापर करून १०२ खोल्यांचे सर्व सुविधांनी युक्त भव्य निर्माण कार्य प्रारंभ करण्याचे नियोजन झाले आहे अशी माहिती महासभा अध्यक्ष नंदकुमार गादेवार महासचिव गोविंद बिडवई, बांधकाम समिती अध्यक्ष डॉ.सूर्यकांत शिरपेवार ह्यांनी पत्रकारांना दिली. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व बांधकाम समिती चे सर्व पदाधिकारी सदस्य, हितचिंतक,दांनदाते सेवादाते,भुखंड मिळवून देण्याच्या प्रक्रियेतील सर्व मंडळी व काशी अन्नपूर्णा सत्रम,आदींनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे व महासभेच्या पाठपुराव्या मुळे अल्पावधीतच हे यश मिळाल्याचे महासभा अध्यक्ष नंदकुमार गादेवार, कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार, महासचिव गोविंदराव बिडवई,

बांधकाम समिती अध्यक्ष डॉ.सूर्यकांत शिरपेवार, सचिव सदानंद मेडेवार, कोषाध्यक्ष अनिल मनाठकर आदींनी तिरुपती येथील निविदा प्रक्रिये नंतर पत्रकाराना सांगितले. नियोजित भक्त निवास हे पाच मजली असून ९० हजार स्क्वेअर चौ.फूट बांधकाम लोक सहभागतून होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.सदरील भक्त निवास हे तिरुपती बालाजी येथील वासवी नगर एम.आर.पल्ली, महात्मा गांधी रोड येथे असून संरक्षक भिंत निर्माण पूर्ण झाल्याच त्यांनी सांगितले.मागील वर्षी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा, काशी अन्नपूर्णा सत्रम सह आर्य वैश्य समाजातील मंडळींच्या सहभागाने व माजी अर्थमंत्री आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते, ते भक्तनिवास प्रत्यक्षात अल्पावधीतच साकारत असल्याने ह्या सर्व मंडळींचे आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्यांनी अभिनंदन केलं आहे .

पार्किंग अधिक पाच मजले, १०२ खोल्यांचे भक्त निवास हे ९० हजार चौ.फूट स्लॅब चे आहे. ह्यात काही व्हि.आय.पी.सूट अंतर्भाव आहे.विशेष म्हणजे दांनदात्यांच सुरुवाती पासूनच योगदान आहे. अनेकांनी निर्माण कार्या दरम्यान सहकार्य करण्याचं अभिवचन दिल्याने आर्यवैश्य महासभा, बांधकाम समिती पदाधिकारी आणि सदस्यांनी ऋण व्यक्त केलं आहे.आर्य वैश्य समाजातील गणमान्य मंडळी, समाजसेवक,समाजातील विवीध संघटनेचे पदाधिकारी, व निर्माणासाठी अर्थदान, सेवादान, करण्यास इच्छुक मंडळी येत्या २० ऑगस्टला ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तिरुपती येथे पोचनार असल्याने त्यांनी ह्याबाबत आपली माहिती ९३०७५३९९९८ ह्यावर पाठवावी जेणेकरून सहभागी मंडळींच योग्य नियोजन करता येईल अस बांधकाम समिती अध्यक्ष डॉ.सूर्यकांत शिरपेवार ह्यांनी म्हंटल आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आर्य वैश्य समाजासाठी हि भक्तनिवास भूषणावह असून आदर्श उपक्रम म्हणून नावलौकिक होत असल्याच महासभा अध्यक्ष नंदकुमार गादेवार ह्यांनी म्हंटल आहे. भक्त निवास निर्माण कार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सुविख्यात आर्किटेक्ट ऋषिकेश चंद्रकांत शिरपेवार, स्ट्रकक्चरल इंजिनीयर अभय लोकमनवार ह्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. भक्तनिवास निर्माण संदर्भातील सर्व सहभागी आर्य वैश्य समाजबांधव आणि सर्व समित्या जोमाने ह्या कार्यात सहभागी झाल्याने निर्माणकर्ता मंडळी प्रोत्साहित झाली आहे अशी माहिती महासभा कोषाध्यक्ष डी डी महाजन ह्यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें