संपादक कृष्णा कऱ्हाळे
कळमनुरी मतदारसंघातील विधानसभा प्रत्येक सर्कलमधील शिवभक्तांनी चिंचाळेश्वर महादेव मंदिर कळमनुरी ते ओम कयाधू अमृतधारा महादेव हिंगोली मंदिरापर्यंत सर्व हिंगोली जिल्हा बरोबरच कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील सर्वच शिवभक्तांनी भव्य दिव्य कावड यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शंकर लगड युवा समाज सेवक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परंपरेप्रमाणे नुसार श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य कावड यात्रा चिंचाळेश्वर महादेव मंदिर कळमनुरी ते ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली अशी निघणार आहे. या कावड यात्रेत लाखो शिव भक्तांच्या उपस्थितीत हिंदुत्वाचा अभूतपूर्व जल्लोष साजरा होणार असल्याने हिंगोली जिल्ह्यातील शिवभक्त शिवसैनिक यांनी सहभागी होऊन भव्य दिव्य कावड यात्रेत सहभाग नोंदवावा. हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेल्या कावड यात्रेत सहभागी होऊन कावड यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन कावड यात्रेचे प्रमुख तथा आ. संतोष बांगर यांनी केले आहे. त्या अनुषंगाने या कावड यात्रेत शिवसैनिक, शिव भक्त,हिंगोलीतील सर्व व्यापारी बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून हजारोंच्या संख्येने कावड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन शंकर लगड युवा समाज सेवक यांनी केले आहे.













