April 20, 2026 9:52 am

शिवाजी महाविद्यालयात पदविदान समारंभ संपन्न

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली– येथील शिवाजी महाविद्यालयात परीक्षा विभाग, विद्यार्थी विकास विभाग व गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बी.ए., बी.कॉम व बी.व्होक या शाखेच्या विद्यार्थ्यांच्या मान्य झालेल्या पदव्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक तथा माजी शिक्षणाधिकारी मा.शिवाजीराव पवार तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. शिवाजी महाविद्यालय, परभणी येथील प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ.मंदाताई पवार उपस्थित होत्या.

प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पदवी प्राप्त केलेला तरुण हा भारताचा सूजान नागरिक झाला पाहिजे. प्रत्येकाने माणूस बनून समाजात वावरले पाहिजे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याचे भान प्रत्येक तरुणाने ठेवावे. नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा, तसेच आयुष्यात कोणत्याही कामाची लाज बाळगता कामा नये तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार यांनी देशाच्या प्रति, समाजाच्या प्रती असलेली कर्तव्य विद्यार्थ्यांनी पार पाडली पाहिजेत, तसेच जीवनात थोरामोठ्याचे आदर्श ठेवून आपले जीवन यशस्वी केले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा विभाग प्रमुख डॉ.मनिषा गवळी, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.सुनिल कांबळे, गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ.सुभाष शेरकर तसेच डॉ संगीता मुंढे, डॉ.सुनंदा भुसारे, डॉ.गुणाजी नलगे, डॉ.निवृत्ती हुरगुळे यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धाराशिव शिराळे यांनी केले तर आभार डॉ.सुनिल कांबळे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने पदवी प्राप्त विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक वृंद तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें