संपादक कृष्णा कऱ्हाळे
सेनगाव :दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मौजे हिवरखेडा येथून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ कडे दि 03/08/2025 रविवार रोजी कावड यात्रेचे हिवरखेडा येथून सकाळी सात वाजता औंढा नागनाथ कडे प्रस्थान होणार आहे प्रस्थान होणार आहे तरी गावातील सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने कावड यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार शिवशंकर निरगूडे यांनी केले आहे
दरम्यान दि 03/08/2025 रोजी सकाळी 7 वाजता कावड यात्रेचे मौजे हिवरखेडा येथील मारुती मंदिर येथून कावड यात्रेचे प्रस्थान होणार आहे केलसूला साखरा हत्ता सेनगाव पुसेगाव व संध्यकाळी नरसी नामदेव महाराज मंदिर येथे मुक्काम राहणार आहे दिनांक 04/08/2025 रोजी नरसी नामदेव येथून केसापूर फाटा दिग्रस मार्गे औंढा नागनाथ कडे प्रस्थान होणार आहे यादरम्यान एक ठिकाणी कावड यात्रा चहापाण्याची फराळाची जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे या कावड यात्रेत सुमारे 150 ते 200 शिवभक्तांचा सहभाग असणार आहे जय बजरंग कावड मित्र मंडळाच्या वतीने कावडीचे आयोजन करण्यात आले आहे













