April 21, 2026 4:23 am

औंढा नागनाथ येथील गलांडी शिवारातील आखाड्यावरील दापत्याला मारहाण करत महिलांच्या अंगावरील दागिने लुटले 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शिवारातील दोन आखाड्यांवर आलेल्या चार चोरट्यांनी महिला व पुरुषांना मारहाण करून दागिने लुटल्याची घटना घडली असून या प्रकरणी शुक्रवारी ता. २५ सायंकाळी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील रामा पटवे यांचा औंढा नागनाथ शिवारात आखाडा आहे. त्याबाजूलाच अन्य एका शेतकऱ्याचा आखाडा असून या ठिकाणी पती, पत्नी राहतात. शुक्रवारी ता. २५ पहाटेच्या सुमारास चार चोरटे या आखाड्यावर आले. त्यांनी त्या ठिकाणी झोपेत असलेल्या पटवे पती पत्नीला जागे केले. त्यांनतर त्यांना मारहाण केली. या अचानक होत असलेल्या मारहाणीमुळे दोघेही घाबरून गेले. त्यानंतर चोरट्यांनी पटवे यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले.

त्यानंतर चोरट्यांनी बाजूच्याचा आखाड्यावर जाऊन त्या ठिकाणीही मारहाण करून महिलेच्या अंगावरील दागिने लुटले. या दोन्ही घटनेमध्ये. चोरट्यांनी ८ तोळे वजनाचे चांदीचे काकण, २४ तोळे वजनाचे चांदीचे दागिने, पाच ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपाधिक्षक सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक कानगुले, वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या शिवाय गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात पाहणी केली आहे. याप्रकरणी रामा पटवे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात चार चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस निरीक्षक राहिरे पुढील तपास करीत आहेत.

रात्री आलेल्या चौघांची पोलीसा कडून चौकशी सुरू

या आखाड्यावर गुरुवारी रात्री आठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास चार जण आखाड्यावर आले होते पाऊस येत असल्यामुळे आम्ही येथे थांबलो असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर ते तिथून निघून गेले पोलिसांनी या चौघाचा शोध सुरू

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें