April 21, 2026 4:25 am

हिंगोली जिल्ह्यात विमा कंपनीच्या वतीने फसल बिमा पाठशाळा व प्रचार 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भारतीय कृषी पीक विमा कंपनी च्या वतीने फसल बिमा पाठशाला व प्रचार प्रसिद्धी चे काम सुरू असून, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपले पीक नैसर्गिक आपत्ती मुळे होणाऱ्या नुकसानी पोटी नुकसान झाल्यास सदर पीक संरक्षित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले प्रधानमंत्री पीक विमा नोंदणी ०१ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ पर्यंत सहभाग घेता येणार आहे तसेच सहभाग घेण्यासाठी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र, बँक, तसेच या केंद्र शासनाच्या पोर्टल वर शेतकरी स्वतः नोंदणी करू शकतात असे यावेळी माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तसेच भारतीय कृषी विमा कंपनी हिंगोली जिल्हा समन्वयक संतोष तायडे, हिंगोली चे तालूका समन्वयक अनिल साबळे, कळमनुरी चे तालूका समन्वयक ज्ञानेश्वर व्यवहारे यांची उपस्थिती होती

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें