हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील गंगोत्री वृद्धाश्रमात कोटेशन भरून देखील महावितरण कडून वीज कनेक्शन जोडून दिले जात नाही त्यामुळे वृद्धाश्रमातील वृद्ध माता पिता कर्मचारी यांचे मोठे हार होत आहे गंगोत्री वृद्धाश्रमाचे संचालक सचिन गांजरे यांनी सेनगाव येथील कार्यकारी अभियंता यांना वारंवार मागणी केली आहे मात्र संबंधित अधिकाऱ्याकडून यावर यावर दुर्लक्ष केले जाते यासंदर्भात सचिन गांजरे यांनी काल दिनांक 11 सात 2025 रोजी जिल्हाधिकार्यालयात निवेदन सादर केली आहे 14 वर्ष पर्यंत वीज कनेक्शन जोडून दिली नाही तर येत्या 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा देखील दिला आहे
सेनगाव तालुक्यातील केलसूला येथील गंगोत्री वृध्दाश्रम केलसुला वृध्दाश्रमामध्ये महिला व पुरूष एकूण 10 वृध्द असुन सदर वृध्दाश्रमामध्ये राहतात मात्र त्याना विज उपलब्ध नसल्यामुळे डि.पी.सि.टी. अंतर्गत वृध्दाश्रमामध्ये विज उपलब्ध करून देण्यात बाबत दि. 30/04/2025 रोजीला उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विज उपविभाग, सेनगांव जि. हिंगोली या कार्यालयामध्ये विजकेनक्शन करीता कोटेशन भरले असुन सुध्दा अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसुन विज कनेक्शनची पुर्तता झालेली नाही. त्यामुळे दि. 14 ऑगष्ट 2025 रोजी पर्यंत सदरील वृध्दाश्रमामध्ये विज कनेक्शन देण्यात यावे अन्यथा दि. 15 ऑगष्ट 2025 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली कार्यलयात येथे आत्मदहन करणार अशा इशारा सचिन गांजरे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे













