हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील चित्रकार दिलीप दारव्हेकर हे कळमनुरी तालुक्यातील सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय, कवडा येथे कला शिक्षक आहेत, त्यांना महीनाभरासाठी वारीला जाने शक्य नाही तेव्हा त्यांची ही भक्तीसेवा संत सावता माळी यांच्या सारखी म्हणावी लागेल. पालख्यांनी प्रस्थान ठेवले. आपले मात्र इथेच पंढरपूर!
सावता माळी म्हणतात तसे,
स्वकर्मांत व्हावें रत। मोक्ष मिळे हातोहात ॥ कांदा, मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी ॥ लसूण, मिरची, कोथंबिरी। अवघा झाला माझा हरी ॥ सावतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ वारी सुरू होताच मनातील भाव ते कागदावर चित्रस्वरुपात उमटवतात. गेल्या अकरा वर्षांपासून त्यांचा हा माझी चित्रवारी उपक्रम सुरू आहे. यंदाचे १२ वे वर्ष आहे. दर वर्षी वारीतील सामाजिक ,धार्मिक भावभावना आपल्या वेगळ्या शैलीत व अनोख्या वारीच्या विषयावर चित्र साकारुन वारीचा आनंद साजरा करतात,या काळात त्यांनी जवळपास ३०० चित्रांचा वेगवेगळ्या माध्यमातील चित्र संग्रह तयार झाला आहे. या वर्षीचा विषय बाल केंद्रीत असून यात बालमनातील वारकरी संत यांची संकल्पना लक्षात घेऊन बालकांच्या विविध भावमुद्रा वारकऱ्यांच्या वेशात चित्ररूपात साकारल्या आहेत आषाढीनिमित्त या सर्व चित्रांचे चित्र प्रदर्शन भरवल्या जाणार आहे













