April 21, 2026 4:18 am

हिवरखेडा येथे वन्य प्राण्यांचा हैदोस कोवळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वन्य पाण्याच्या त्रासाला कंटाळून मेटाकुटीस आलेला आहे सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवताना शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. त्याचवेळी अतोनात खर्च करून कष्टाने जगविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखेडी हिवरखेड़ा खड़की धोतरा हत्ता कापडशिंग शिवारातील आत्ता सोयाबीनची पिक सध्या जोमात आले आहे मात्र काही पिक पेनगंगेच्या पुरामुळे खरडून गेली आहे तर काही पिके वन्य प्राणी खात आहेत धोतरा शिवारात फॉरेस्ट विभागाचे जंगल आहे त्यामुळे वन्य प्राणी रोही डुक्कर रात्रिच्या वेळी शेतात येऊन वन्य प्राणी शेती पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत सध्या सोयाबीन पीक कोवळ्या अवस्थेत असून रात्री,अपरात्री रोही रानडुकरांनी संपूर्ण शिवारात हैदोस घातला आहे.

हिवरखेडा धोतरा शिवारात डोंगरमाथ्याच्या शेजारी व परिसरात रानडुकरांसह रोही वन्यप्राण्यांचा धुमाकुळ सुरू आहे. बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहे. मात्र, वन्यप्राणी नासाडी करतात त्यामुळे सध्या कोवळ्या अवस्थेत आलेला घास हिरावला जात आहे.

 *वन्य प्राण्याकडून सोयाबीन पिकांची नासाडी*

वन्य प्राण्याकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीयानें लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी. संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. सेनगाव तालुक्यातील वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील डोंगराळ भागात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा फटका बसत आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थाकडून केली जात आहे

*अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रारच करता येत नाही*

वन्य प्राण्यांनी शेतातील पिकांचे नुकसान केल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकरी वनविभागाच्या दारात गेल्या वर पहिले ऑनलाईन तक्रार करा नंतर चौकशी नंतर पंचनामा अहवाल त्यासाठी लागणारे कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा टोच नकाशा रहिवाशी बँक पासबुक अश्या ह्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर नुकसान कितीवाही होऊ द्या पैसे येणार 2000ते 3000 फक्त आणि वरील कागदपत्रे तयार करणासाठी 1000 ते 1500 रुपये खर्च येतों दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या पदरात नुकसान भरपाई ची रक्कम पड़ते मात्र केवळ दोन ते तीन हजारांची मदत असते शेतकऱ्यांचे लाखो चे नुकसान असतांना भरपाई रक्कम मात्र खीरापत सारखी दिली जाते अनेक शेतकऱ्यांना तर ऑनलाईन तक्रार सुध्दा करता येत नाही मग त्यांनी काय कशी तक्रार करायची?

*प्रतिक्रिया*

माझ्या शेतातील गट क्रमांक 187 शेत शिवार हिवरखेडा येथील दिनांक 30 6 2025 रोजी मध्यरात्री वन्य प्राण्यांच्या कंपने माझ्या शेतातील सुमारे अर्धा एकर मधील सोयाबीन पूर्णपणे खाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे वन विभागाच्या वतीने याचा तात्काळ पंचनामा करून मला यांची तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी

 *दत्तराव कुंडलिक निरगुडे राहणार हिवरखेडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली*

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें