April 21, 2026 9:07 am

न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांची 112 वी जयंती “महाराष्ट्र कृषी दिन” म्हणून साजरी करण्यात आली.

कृष्णा कऱ्हाळे संपादक TV24मराठी हिंगोली

न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांची 112 वी जयंती “महाराष्ट्र कृषी दिन” म्हणून साजरी करण्यात आली.1 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांची 112 वी जयंती “महाराष्ट्र कृषी दिन” म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके होते. त्यांच्या हस्ते मा. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सचिन काळबांडे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी डॉ. सुनिल हजारे, प्रा. सुनिल पाटील, प्रा. सुभाष मापारी, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. विजय कांबळे, प्रा. व्ही. आर. चव्हाण, प्रा. मधुकर लेमले, प्रा. ए. ए. अवचार तसेच श्री. संजय डाके, श्री. गजानन शिंदे, श्री. भिमसंदेश दिपके, श्री. कैलास बांगर, श्री. अल्लाउद्दीन पठाण, श्री. किरण लोडे, श्री. महेंद्र दिपके इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें