April 23, 2026 2:02 pm

हिंगोलीतील वसमत येथील हॉटेलमध्ये दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला : एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हयातनगर फाट्यावर मंगळवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. एका बारसमोर प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून तिघांनी दोघा तरुणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विशाल मुंजाजी देवरे (वय 22, रा. थोरावा) याचा जागीच मृत्यू झाला, तर ओमकार देवीदास नरवाडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. ही घटना दि.24 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. हल्ला करणाऱ्यांमध्ये ऋषीकेश कदम (रा. सारोळा), गोपाळ रंगनाथ देवरे आणि शिवाजी देवरे (दोघे रा. थोरावा) यांचा समावेश आहे. तिघांनी चाकूने अचानक हल्ला करत विशाल आणि ओमकार यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात विशालच्या छातीत आणि पोटात गंभीर वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस स्टेशनचे सपोनि संग्राम जाधव, पोलीस कर्मचारी कृष्णा चव्हाण, सम्राट कासले यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत तपास सुरु केला. याप्रकरणी मृत विशालचा भाऊ आदिनाथ देवरे यांनी हट्टा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे विकास पाटील,सपोनि शिवसांब घेवारे यांनी भेट देत पाहणी केली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलीसांनी रात्री उशिरा अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे.सदरील घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें