प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथे हरिनाम सप्ताह निमित्त शिवव्याख्याती युवा कीर्तनकार महाराष्ट्र भूषण कुमारी भाग्यश्री मोहिते पाटील यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह भ प कु भाग्यश्री मोहिते यांनी उपस्थित भावीक भक्तांना सांगितले की मोबाईलचा अतिवापर हे आपल्या जीवनाशी फार मोठा घातक आहे. विशेष करून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोबाईलचा वापर हा चांगल्या बाबीसाठी करावा त्यामध्ये जे काही आपल्याला चांगले घेता येईल तेव्हा कुठे ठीक आहे.
प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना मुलींना शिक्षणाचे महत्त्व सांगणे महत्त्वाचे आहे.
कारण शिक्षण हे माणसाला चांगल्या ठिकाणी नेऊन मानसन्मान मिळवून देतं. असेही यावेळी ह भ प कु भाग्यश्री मोहिते यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.कु भाग्यश्री मोहिते आपल्या कीर्तनामधून नेहमीच व्यसनमुक्ती वृक्ष संवर्धन बेटी बचाव बेटी पढाव वृक्ष लावणे व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. असे यावेळी कु भाग्यश्री मोहिते यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थित भाविक भक्तांना सांगितले. प्रत्येकांनी जर आपण आपल्या आई-वडिलांची सेवा केली तर आपल्याला कोणत्याही देवदर्शनाला किंवा यात्रेला जाण्याची जरुरत नाही असेही यावेळी कु भाग्यश्री मोहिते यांनी सांगितले.













