हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील देवकृपा विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी भागवत दत्तराव मोटे याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. भागवत याने तालुका, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. कुटुंबात जन्मलेल्या शेतकरी भागवतने त्याला कुठलेही प्रशिक्षण 5 नसताना हे घवघवीत यश मिळवले. हत्ता गावामध्ये गावकऱ्यांच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवी उड़क गडदे, लिंबाजी राठोड, ममता हिमगिरे, नामदेव वाणी, ज्ञानेश्वर गादेकर, बालू- कुरवाडे, बाजीराव नाईक, कुंडलिक चेके, १० सुखदेव ठोके, संतोष घाटुळ, गोलापात्रे, काचगुंडे ग्रामस्थ उपस्थित होते. ज्ञानेश्वर गादेकर यांनी सूत्रसंचालन आणि हिमगिरे यांनी आभार प्रदर्शन केले.













